वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री १० ची? अतिक अहमच्या हत्येप्रकरणी सिब्बल यांना पडले ८ प्रश्न

प्रयागराज: १५ एप्रिलच्या रात्री प्रयागराजच्या कॅल्विन वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची हत्या करण्यात आली. ती घटना सगळ्या जगाने आपल्या डोळ्यांनी पाहिली. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात असतानाच या दोघांची हत्या करण्यात आली.कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना तिघेजण आले आणि त्यांनी पोलिसांसमोर दोघांवर गोळ्या झाडल्या. या हत्येला खूप कालावधी उलटला आहे. पण काही प्रश्न तसेच समोर आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी या हत्याकांडावर आठ असे प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तर मिळाली नाहीत. परंतु सिब्बल यांचे हे प्रश्न प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण करतात.



कपिल सिब्बल यांनी काल (सोमवारी) संध्याकाळी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, “अतिक आणि अशरफ, नष्ट करण्याची कला, आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की, रात्री १० वाजता वैद्यकीय तपासणी करणार होते. पीडितांना चालवत नेलं जात होतं. माध्यमं सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होती. मारेकरी एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांच्याकडे सात लाखांची शस्त्र होती. हल्लेखोर आधीपासूनच प्रशिक्षित होते. तिन्ही मारेकऱ्यांनी हत्येनंतर आत्मसमर्पण केलं” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.अतिक आणि अशरफ या दोघांच्या हत्येचा कट रचला गेला का? हा प्रमुख प्रश्न आहे. कारण या दोघांना ठार करणारे तीन हल्लेखोर विविध भागातून प्रयागराजला आले होते. हत्येनंतर या तिघांनी जय श्रीरामचे नारे दिले. हत्या केल्यानंतर तातडीने बंदूक फेकून देत आत्मसमर्पण देखील केलं. त्यामुळे यामागे कट रचला गेला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने