'मन की बात'च्या 100 व्या भागात आमिर सहभागी! मोदींची स्तुती करत म्हणाला, 'देशाचा सर्वात मोठा नेता तुमच्याशी... '

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी गेल्या काही काळापासून संपर्क साधत आहे. यामध्ये ते महत्त्वाच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवतात. त्याच्या समस्या जाणुन घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतात. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाले आहेत.राजधानी दिल्लीत 'मन की बात @ 100' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित केला जाणार आहे, ज्यामध्ये 100 लोक सहभागी झाले होते.पीएम मोदींनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात या लोकांचा उल्लेख केला आहे . या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री रवीना टंडनही पोहोचले. आमिर खानने पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाला ऐतिहासिक उपक्रम असल्याचे वर्णन केले आणि त्याचे जोरदार कौतुक केले.नवीन अहवालांनुसार, आमिर खान आणि रवीना टंडन यांच्यासह अनेक अभिनेते आणि खेळाडू, पत्रकार, रेडिओ जॉकी आणि व्यावसायिक बुधवारी एकदिवसीय परिषदेत सहभागी होतील. आमिरने पीटीआयला 'मन की बात' यावर त्याचे मत सांगितलं आहे.आमिर खान म्हणाला, 'देशाचा सर्वात मोठा नेता तुमच्याशी बोलतोय ही मोठी गोष्ट आहे. महत्त्वाचे विचार तुमच्यासोबत शेअर करत आहे. देशाला पुढे नेणारे विचार ते तुमच्यासमोर ठेवत आहेत. सर्वसामान्यांचा सल्ला घेत आहेत. मन की बात कार्यक्रमात चर्चा झालेल्या या सर्व गोष्टींबद्दल तुमचा नेता तुमच्याशी बोलत आहे हे खूप महत्त्वाचं संभाषण आहे. आमिर म्हणाला, "मन की बातचा भारतातील लोकांवर खोल परिणाम झाला आहे."नवी दिल्ली येथे एक दिवसीय परिषद झाली, ज्याचे उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आमिर खान, रवीना टंडन यांच्याशिवाय पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी, दीपा मलिक, संगीतकार रिकी केज यांसारख्या दिग्गज व्यक्तीही सामिल होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने