वॉर्नरच्या पत्नीचा खळबळजनक आरोप; माझ्या पतीचे करिअर संपवण्याचा प्रयत्न

मुंबई: आयपीएलच्या महाकुंभात ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सध्या चर्चेत आला आहे. वॉर्नरच्या पत्नीने खळबळजनक आरोप केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे वॉर्नरच्या पत्नीने म्हटलं आहे.ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील त्याची कामगिरी अतिशय चांगली आहे. मात्र तो अनेकदा वादात अडकला आहे. दरम्यान, मॅटी जॉन्स पॉडकास्टमध्ये त्याची पत्नी कँडिस वॉर्नरने बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानवर गंभीर आरोप केले आहेत.



काय म्हणाली कँडिस वॉर्नर?

सँडपेपर-गेट प्रकरणानंतर सीएनं आपल्या पतीला राष्ट्रीय टीममधून कायमस्वरूपी काढून टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कँडिसनं केला आहे.दक्षिण आफ्रिकेतील हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिडला पाठिंबा दिला नाही. "डेव्हिडला कोणताही आधार नव्हता. मुळात आम्ही दक्षिण आफ्रिकेतील हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हापासून डेव्हिडची कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला मदत करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.जणू काही यातून सीए सांगण्याचा प्रयत्न करत होतं की, 'तू आता स्वत:चा बचाव कर. तू दिलेल्या सेवेबद्दल धन्यवाद. तू परत कधीही देशासाठी क्रिकेट खेळू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुलाच दोष देणार आहोत.' सीएनं डेव्हिडची कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न केला," असं कँडिस वॉर्नर म्हणाली.

नेमकं काय प्रकरण?

तत्कालीन कसोटी उप-कर्णधार वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान कॅमेरून बॅनक्रॉफ्टला सँडपेपरचा तुकडा वापरून चेंडूशी छेडछाड करण्यास सांगितलं होतं.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बॅनक्रॉफ्टला खेळातून नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. तर वॉर्नर आणि स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. स्मिथच्या कॅप्टन्सीवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती, तर वॉर्नरच्या कॅप्टन्सीवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आचारसंहितेत सुधारणा करून वॉर्नरला रिव्ह्यू अपील करण्याची परवानगी दिली होती. नियमावली संबंधित तयार केलेल्या कमिशनरच्या स्वतंत्र कमिटीनं ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर वॉर्नरनं नेतृत्व बंदीच्या विरोधात केलेलं अपील मागे घेतलं आणि रिव्ह्यू पॅनेलवर 'पब्लिक लिंचिंग'चा आरोप केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने