असदचं एन्काऊंटर, कंगनाला आनंद! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं तोंडभरून कौतूक

मुंबई: कुख्यात गँगस्टर अतीम अहमदचा मुलगा असद अहमदचा एनकाउंटर झाल्यानंतर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगनानं दिलेली प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिनं नेहमीप्रमाणे तिच्या हटक्या अंदाजात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले आहे. कंगनाची ती पोस्ट चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.युपी एसटीएफनं गुरुवारी उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी अतीक अहमदचा मुलगा असद अहमदचा एनकाऊंटर केला. पोलिसांच्या या कारवाईमध्ये असदचा मित्र गुलाम हा देखील मारला गेला. विरोधी पक्षानं या एनकाऊंटरला खोटं असं म्हटलं असून अनेक लोकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक केले आहे.

 


यासगळ्यात बॉलीवूडची क्वीन कंगनाची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे.अतीकच्या एनकाउंटरनंतर कंगनानं एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये तिनं इंस्टावरुन स्टोरी शेयर केली आहे. त्यात ती लिहिते की, माझे बंधू योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कुणी नाही. यासोबत तिनं भलीमोठी पोस्ट शेयर केली आहे. तुम्ही जर वाईट असाल तर त्याचा बाप म्हणजे मी आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दुसरे कुणी नाही. तुम्हाला आता गँगस्टर म्हणजे काय कळाले असेल, योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेमुळे गँगस्टरचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा शब्दांत कंगनानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कंगनाच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती आता चंद्रमुखी २ मध्ये दिसणार आहे. ब्लॉकबस्टर तमिळ हॉरर मुव्ही चंद्रमुखीचा पुढचा भाग हा प्रेक्षकांच्या अनेक दिवसांपासून कुतूहलाचा विषय आहे. पहिल्या भागामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका यांनी भूमिका केल्या होत्या. कंगना चंद्रमुखी ही २ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कंगना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीवरील बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.यापूर्वी कंगनाच्या इमर्जन्सी नावाच्या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता. त्यामधील तिच्या नव्या लूकचे आणि अभिनयाचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतूक केले होते. आता त्या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. याशिवाय कंगनाचा मणिकर्णिका रिटर्न्स - द लिजंड ऑफ दिद्दा आणि द अवतार - सीता या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने