पप्पाचा प्रोजेक्ट डायरेक्ट करतोय आर्यन! लाडक्या लेकाच्या करिअरसाठी शाहरुखची धडपड सुरुच

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. नुकताच त्याच्या पठाण या चित्रपटाला मिळालेल्या लोकप्रियतेवरुन याचा अंदाज येतोच.मात्र शाहरुख बरोबरच त्याचा मुलगा आर्यन खानही काही कमी लोकप्रिय नाही. त्याचाही एक वेगळा चाहतावर्ग आहे.आर्यन खान हा नेहमी चर्चेत असतो. त्यासाठी त्याने काही करणे गरजेचे नाही. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्याला बऱ्याच वेळा त्याच्या वागण्यावरुन ट्रोल केलं जात. तो लवकरच अभिनय नव्हे, तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. तेही वेबसीरिजच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. याचा खुलासा काही दिवसापुर्वीच आर्यनने एक पोस्ट शेअर करुन केला होता.आता पुन्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण, यावेळी यामागचे कारण काही वेगळेच आहे. आर्यनने त्याचा पहिला प्रोजेक्ट सुरू केला आहे. ज्यामध्ये तो त्याचे वडिल शाहरुख खान याचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे. आता अलीकडेच सेटवरून आर्यनचा फोटो समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. हा फोटो आर्यनची बहिण सुहाना हिने शेअर केला आहे.सुहानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आर्यनचा इंटेन्स लूक शेअर केला आहे. तो पाहिल्यानंतर नेटकरी खूप प्रभावित करत आहे. काही वेळा पुर्वी सुहानासोबत शाहरुखनेही आर्यनच्या माध्यमातून दिग्दर्शित करण्यात येणाऱ्या ब्रँडच्या जाहिरातीचा टीझर शेअर केला होता. आर्यनने आपल्या करिअरची सुरुवात अभिनयाऐवजी दिग्दर्शनातून करण्याचा विचार केला आहे.

दुसरीकडे, शाहरुख खाननेही मुलाच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात येत असलेल्या जाहिरातीची झलक शेअर केली होती. या अॅड शूटसाठी शाहरुख आणि गौरीने त्यांच्या मुलाला खूप सपोर्ट केला आहे.आता सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच स्टार्सही आर्यनला त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत. आर्यनने हा "लाइफस्टाइल लक्झरी कलेक्टिव" ब्रँड गेल्या वर्षी लॉन्च केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने