पंकजा मुंडेंना मोठा धक्का! अंबाजोगाई बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय

बीड: राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट होतं आहेत. तर बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीमध्ये मुंडे बहिण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.या निवडणुकीच्या प्रचारावेळी मुंडे बहिण भावांनी एकोंमकांवर गंभीर आरोप केले होते. त्याच आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे.आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण १८ जागांपैकी तब्बल १५ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने