भारतविरोधी शक्तींवर कठोर कारवाई करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चर्चेदरम्यान भारतीय दूतावासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सुनक यांना भारतविरोधी शक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यादरम्यान आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्वीपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली.भारतात आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेल्या आणि नंतर ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या ठकसेनांच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईबाबत देखील मोदी यांनी सुनक यांच्याशी चर्चा केली.या ठकसेनांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी सुनक यांच्याकडे केली. आर्थिक गैरव्यवहार करून ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली आहे.‘मागील महिन्यात ब्रिटनमधील भारताच्या दूतावासावर झालेला हल्ल्या कोणत्याच परिस्थितीमध्ये समर्थन करता येणार नाही,’ असे सांगत सुनक यांनी ब्रिटनमधील भारतीय दूतावासाची आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची हमी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने