फ्लॉप चित्रपटांमुळं अक्षयच्या हातातुन निसटला 'राऊडी राठोर 2'.. या अभिनेत्यानं मारली बाजी?

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपटांचे सिक्वेल येत आहेत. जे बॉलिवूडमध्ये गाजतही आहे. आता नुकतच ब्रम्हास्त्र आणि वॉर या चित्रपटांच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली त्याचबरोबर आता अनेक चित्रपटांच्या चर्चाही सुरू आहेत.आता ताज्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, 'राऊडी राठोर' या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू आहे. चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये स्टारकास्टमध्ये बदल झाल्याचे अनेकदा बोलण्यात आलं आहे.'राउडी राठोर' या चित्रपटाच्या सिक्वेलच्या मुख्य अभिनेत्याबद्दल बोलायचं झालं तर आता त्यातुन अक्षय कुमारचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे.2012 मध्ये 'राऊडी राठोर' हा चित्रपट आला होता आणि त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.आता या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राला घेण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 'राऊडी राठोर 2' या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असा दावा करण्यात आला येत आहे.याविषयी 'पिंकविला'ने वृत्त दिले आहे. त्यानुसार एका सूत्राने सांगितले आहे की, चित्रपट निर्माती शबिना खान काही काळापासून 'राऊडी राठोर' चा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहेत. तिने शेवटी 'राऊडी राठौर 2' या चित्रपटाची कल्पना लॉक केली आहे. तर चित्रपटासाठी पोलीस पोलिसाच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ मल्होत्रासोबत चर्चा सुरू आहे.सिद्धार्थ मल्होत्रानेही या चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली आहे. मात्र तरी तो अजूनही विचार करत आहे की रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्सशिवाय दुसरी पोलिसाची भूमिका घ्यायची की नाही या चित्रपटाची निर्मिती शबिना खान आणि संजय लीला भन्साळी करणार असल्याचे सूत्राने सांगितले.

निर्माते येत्या 2 महिन्यांत चित्रपट सुरू करण्याचा विचार करत आहेत. आता चित्रपटातील कलाकारांसोबतच गेल्या वर्षी ब्लॉकबस्टार चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाशीही बोलणं सुरु असल्याच सांगण्यात आलं आहे.2012 साली रिलीज झालेल्या 'राऊडी राठोर' या चित्रपटात अक्षय कुमार दुहेरी भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता 'राऊडी राठोर' या चित्रपटाचा सिक्वल येणार असून सिद्धार्थ मल्होत्राला घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यात अक्षय कुमार असेल की नाही याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही.अक्षय कुमार बद्दल बोलायचं झालं तर सध्या त्याच्या चित्रपटांची अवस्था बॉक्स ऑफिसवर खुपच खराब आहे. त्याचे सलग पाच चित्रपट हे फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे अक्षय कुमारला या चित्रपटातुन काढण्यात आले आहे का अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने