एन्रॉनचा उल्लेख करत बारसू रिफायनरीवर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई:  बारसू रिफायनरी संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी एन्रॉन प्रकल्पासह समृद्धी महामार्गाचा दाखला देत बारसू रिफायनरी वर भाष्य केलं. आंदोलकांना अटक किंवा धमकी देण्यापेक्षा मानवी दृष्टीकोनातून हे प्रकरण हाताळलं पाहिजे. राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा, हिताचा आदर केला पाहिजे. पण तस काही दिसत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पण राष्ट्रवादी विकासाच्या आड येणार नाही. मात्र, लोकांचे गैरसमज दुर झाले पाहिजेत. लोकांचे प्रश्नही निकाली लागले पाहिजे.आधी एन्रॉन प्रकल्पालाही असाच विरोध झाला होता. भाजपा शिवसेनेने त्या काळी तो प्रकल्प आणला. त्यानंतर समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता. परंतु लोकांना योग्य मोबदला मिळाल्यावर विरोध दूर झाला.त्याप्रमाणे बारसूतील प्रकल्पाकडेही पाहता येईल. परंतु कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा. आधी लोकांच्या मनातले गैरसमज दूर करावे, संवेदनशील मार्ग काढावा, त्यानंतर सरकारने हा प्रकल्प करावा. अस अजित पवार यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने