'अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका',भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

पुणे:  भाजप पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हंटलं आहे. भाजप पदाधिकारी रवींद्र सळगावकर यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातील भाजपचे अध्यक्ष रवींद्र सळगावकर यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हंटलं आहे.गणेशखिंड रस्त्यावर ई स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार दिली आहे. या प्लॉटची मोजणी करण्यासाठी अजित पवार यांनी दबाव आणला आहे. अर्थात ही मोजणी करता येत नाही. तर या प्लॉटच्या फाइलवर पवारांचं नाव लिहून ठेवण्याचा आरोप टयांनी केला त्याची मी माहिती घेतोय याला विरोध करतोय त्यामुळे अजित पवार यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत. अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. रवींद्र सळगावकर यांनी त्यांच्या लेटर हेडवर तक्रार लिहून खडक पोलिसांना दिली आहे. पुढील तपास, कारवाई पोलिस करतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने