महाराष्ट्रातील तीन सुंदर शहर जाहीर! नेटकऱ्यांनी जोडलं फडणवीस, शिंदे, पवार कनेक्शन

मुंबई: नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील शहरांच्या विकासावर सरकारचा भर आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नगरविकास दिनाच्या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस बोलत होते.शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक मिळाला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने