अजित पवार भाजपसोबत गेले तर राष्ट्रवादीला काय फायदा होणार ?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे कारण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जात असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवारांची ही नवी खेळी असणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले.कधी अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवारांची दिल्ली भेट, त्यानंतर अजित पवार महाविकास आघाडीपासून नाराज, अजित पवार भाजपसोबत जाणार का?, अजित पवार ५३ पैकी ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार, अशा अनेक गोष्टी आपण मागील काही दिवसापासून वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील पण हे कितपत खरंय, हे येणारा काळच सांगणार.



जर अजित पवार भाजपसोबत गेले तर राष्ट्रवादीला काय फायदा होणार? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आज आम्ही याचा थोडक्यात आढावा घेतलाय. चला तर जाणून घेऊया.

१. अजित पवार जर भाजपसोबत गेले तर येणारी २०२४ ची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार. राष्ट्रवादीला निवडणूक अधिक जागांवरुन लढवता येणार आणि भाजपसोबतच्या युतीमुळे सत्तेतही येणार.

२. अजित पवार जर त्यांच्या ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत आले तर २०२४ च्या निवडणूकीत यश मिळाल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या काही आमदारांनाही मंत्रीपद मिळू शकतं. एवढंच काय तर अजित पवारांची मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदावरही वर्णी लागू शकते. याशिवाय अर्थमंत्री किंवा गृहमंत्री असे महत्त्वाचे खातेही त्यांच्याकडे येऊ शकतात.

३. जर भाजपसोबत युती केली तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला फक्त राज्याच्या राजकारणातच येणार नाही केद्रांतही येणार. राष्ट्रवादीच्या नेत्यांची केंद्रीय मंत्रीमंडळातही जागा वाढू शकते.

४. जर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तर याचा सर्वाधिक फायदा होणार त्या नेत्यांना जे इडीच्या रडारवर आहे कारण त्यांना क्लीन चीटही मिळू शकते. आता अजित पवार यांच्यासोबत कोणते नेते भाजपसोबत जाणार, यावरही अवलंबून आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून रडारवर असलेल्या नेत्यांच्या चौकशीला पूर्णविराम लागू शकतो. मग यामध्ये काही नेत्यांना क्लीन चीटही मिळू शकते.

५. भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये फूट पडू शकते. कारण शिंदे गट हे मुळ शिवसेनेपासून वेगळे होण्याचं एक कारण म्हणजे राष्ट्रवादी होतं. आता तीच राष्ट्रवादी जर भाजप सोबत येत असेल तर भाजप आणि शिंदे गटात फुट पडू शकते. याशिवाय पुढेही यांनी एकत्र निवडणूक लढवली तर कधी जागांवरुन तर कधी मंत्रीपदावरुनही त्यांच्यात वाद होऊ शकतो.

भाजप आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले तर याचा फायदा फक्त बड्या नेत्यांना किंवा आमदारांनाच होणार नाही तर सोबत स्थानिक नेत्यांनाही होऊ शकतो. कारण सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी खूप स्ट्राँग आहे आणि यांच्या एकत्र येण्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही सपोर्ट मिळू शकतो त्यांची वर्णी लागू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने