'धर्मवीर' साठी मिळाला पुरस्कार.. प्रसादने मानले सकाळ मीडियाचे आभार

मुंबई: गेल्या वर्षी २०२२ ला आलेला धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारली.धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा बहुचर्चित सिनेमा ठरला.२७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. धर्मवीरने आजवर अनेक पुरस्कार सोहळ्यावर स्वतःचं नाव कोरलंय.आता प्रसादने धर्मवीर साठी सकाळ सन्मान पुरस्कार २०२३ बाजी मारलीय. यासाठी प्रसादचे सकाळ मीडियाचे आभार मानले.



प्रसादने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत प्रसादने मानपत्र आणि सकाळने दिलेली ट्रॉफी दाखवली आहे.हा व्हिडिओ शेअर करून प्रसाद लिहितो.. धर्मवीर साठी अजून एक पुरस्कार...!!! मनःपूर्वक आभार सकाळ मीडिया.. आणि पुन्हा एकदा मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी आणि झी स्टुडिओजचे आभार.. टीम धर्मवीर..आणि प्रविण तरडे खुप खूप प्रेम अशा शब्दात प्रसादने सकाळ मीडिया आणि सिनेमाचे दिग्दर्शक, निर्मात्यांचे आभार मानले.यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. "धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत"

अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली. धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. "धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत"अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली. धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून तो एक खंड आहे.पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती,ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल! आता यासाठी प्रेक्षकांना २०२४ पर्यंत वाट पहावी लागणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने