'त्या' वक्तव्यानंतर संजय राऊतांनी तातडीनं साधला शरद पवारांशी संवाद

मुंबई: मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच सांगू शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्यात पवारांच्या वक्तव्यानंतर उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्याशी तातडीनं संवाद साधला असल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांनी याबद्दल माहिती दिली.आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआची युती तुटावी असं मला कधी वाटलं नाही”, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.काय म्हणाले राऊत?

राऊत यांनी पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी. १ मे रोजी मुंबईत मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत.महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्त्व यात आहे आणि ते राहणार.त्यांची इच्छा आहे की आपण तिघं एकत्र राहिलो, तर २०२४ साली आपण भाजपाचा पराभव करू, लोकसभाही मोठ्या संख्येनं जिंकू या शरद पवारांच्या भूमिका आहेत. मला अजिबात असं वाटत नाही की मविआसंदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल. आम्ही सगळेच सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो.आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआ तुटावी असं मला कधी वाटलं नाही. अस राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने