CM शिंदेंच्या ठाण्यात भाजपला खिंडार! पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश

मुंबई: राज्याच्या राजकारणात पक्ष बदलाचे वारे वाहू लागले अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे मुख्यनेते भास्कर जाधवही उपस्थित होते. महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून राज्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडत असल्याचे दिसून येत आहे.उद्धव ठाकरे यांची मागच्या 9 महिन्यात बऱ्याच जणांनी साथ सोडली आहे. परंतु त्यांच्याबद्दल असलेल्या सहानभुतीमुळे अनेकजण आता पक्षप्रवेश करत आहेत.दरम्यान आज (दि.26) केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील समर्थकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजपला ठाण्यात मोठी खिंडार पडली आहे.भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजपला ठाण्यामध्ये मोठं खिंडार पडलं आहे.

शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सर्वसमावेशक विचारांवर विश्वास ठेवत या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस शशांक गुरुनाथ हरड, शहापूर तालुका उपाध्यक्ष तेजस पडवळ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, ग्रामपंचायत खरीवली सरपंच नीता वातेस, उपसरपंच शिवानी शशांक हरड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आणि समर्थकांसह शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने