मुख्यमंत्री बोम्मई 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार; भाजपची यादी आज जाहीर होण्याची शक्यता!

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतं.भाजपच्या मुख्य निवडणूक समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले, आम्ही सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेणार आहोत. त्यामुळं आज (सोमवार) किंवा मंगळवारपर्यंत आमची यादी जाहीर करु. तसंच त्यांनी शिग्गांव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज किंवा उद्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकतं.भाजपच्या मुख्य निवडणूक समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले, आम्ही सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेणार आहोत. त्यामुळं आज (सोमवार) किंवा मंगळवारपर्यंत आमची यादी जाहीर करु. तसंच त्यांनी शिग्गांव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.रविवारी पक्षाच्या मुख्यालयात पुढील महिन्यात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीईसीच्या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीला उपस्थित होते.2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. यात काँग्रेसनं 80 आणि JD(S) नं 37 जागा जिंकल्या. 224 सदस्यीय संख्या असणाऱ्या कर्नाटकात 10 मे रोजी निवडणूक होणार असून विधानसभेची मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने