2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

रांची:  पुढील वर्षी होणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ३५० पेक्षा अधिक जागा जिंकेल. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला करताना भ्रष्टाचारी नेते एकत्र येऊन गोंधळ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.जनता पंतप्रधान मोदीयांच्या पाठीशी आहे, हे त्यांना ठाऊक नाही. 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि भाजप लोकसभेच्या 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं चौबे म्हणाले. ते रांची येथे एका कार्यक्रमात बोलत होते.झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता, असा आरोप करत चौबे म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था खराब आहे आणि बेरोजगारी वाढली आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री चौबे म्हणाले, "झारखंड सरकार जनताविरोधी आहे. सध्याच्या सरकारच्या काळात पाच हजारांहून अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून एकूण पाच हजार २५८ खून झाले आहेत.झारखंडमधील वाढत्या मानव-हत्ती संघर्षावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेबद्दल चौबे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने