इंग्लंडच्या या जगप्रसिद्ध बिअरच्या नावासमोर इंडिया का लावले जाते?

ब्रिटीश: बिअर हा बिअर प्रेमींसाठी खूप खास विषय आहे. मुख्यत: बिअर प्रेमींसाठी बिअर ही दोन प्रकारची असते. एक स्ट्राँग बिअर तर दूसरी माइल्ड बिअर. मुळात बिअरचे इतके प्रकार आणि फ्लेवर आहे की प्रत्येक बिअरच्या चवीला समजून घेण्यासाठी वर्षे लागतील. अशात एल बिअरही तितकीच फेमस आहे. यातीलच इंडिया पेल एल नावाची बिअरही खूप नावाजलेली आहे.ही बिअर जगप्रसिद्ध आहे. तुम्हाला माहिती आहे का इंग्लंडच्या या जगप्रसिद्ध बिअरच्या नावासमोर इंडिया का लावले जाते? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.इंग्लंडच्या इंडिया पेल एल या लोकप्रिय बिअरच्या नावासमोर इंडिया हे नाव कसं आलं, याची रोमांचक कहानी आहे. तो काळ होता तेव्हाचा जेव्हा ब्रिटीश आपलं साम्राज्य भारतात वाढविण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान इस्ट इंडिया कंपनी भारतात आपले जाळे विस्तारत होती.



त्यावेळी ब्रिटीशांसमोर समस्या होती की ब्रिटीश सैनिक आणि अधिकारी यांना बिअर कशी द्यायची कारण भारतात टेक्नोलॉजीची कमतरता आणि गरम वातावरणामुळे बिअरचं उत्पादन करणे शक्य नव्हतं. त्यातच समुद्री मार्गे सहा महिन्याचा प्रवास करुन इंग्लंडहून भारतात बिअर आणायची म्हटलं की तोवर खराब होणार त्यामुळे भारतात बिअर कशी आणायची, हा सर्वात मोठा प्रश्न होता.याविषयी ड्रिंक्स एक्सपर्ट हेनरी जेफरीज यांनी इंडिया पेल एल चा इतिहास सांगितला. ते म्हणतात, १७८० च्या दशकात लंडनमध्ये बिअर बनविणाऱ्या एका हॉजसन नावाच्या व्यक्तीने यातून मार्ग काढला. त्याने एक अशी बिअर बनवली ज्यामध्ये हॉप्सचा वापर सर्वाधिक असणार.

हॉप्स हे एक फळ आहे ज्याचा वापर बिअर बनविण्यासाठी केला जातो. हॉप्सचा अधिक वापर करण्यात आलेल्या बिअरला वाईनसारखंच काही वेळ स्टोअर करून एज  करावं लागायचं. अशात जेव्हा या बिअरला ब्रिटेनहून भारतात पाठविण्यात आले तेव्हा बिअर सुरक्षितच नव्हती तर याची क्वालिटीही उत्तम होती. इंडिया पेल एल बिअरचं हे पहिलं प्रोटोटाईप होतं. त्यानंतर बदलत्या काळानुसार यांचा रंग अधिक सुंदर होत गेला. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने