आज झालेल्या भीषण अपघाती ठिकाणच्या शिंगरोबा मंदिराविषयी हे माहिती आहे का?

मुंबई: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे चार वाजता मोठा अपघात घडला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात एक खाजगी बस बाजूच्या दरीत कोसळली. या भीषण अपघातात १३ जण मृत्यूमुखी पडले तर २७ जणांना वाचविण्यात यश आलंय.ज्या दरीत ही बस कोसळली त्याच्या पलिकडे शिंगरोबा मंदिर आहे. आज आपण त्याच शिंगरोबा मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.१८ व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी भारताचा विकास करण्याचे ठरविले. वाहतूकीसाठी रेल्वे सुरू केली. मुंबई-ठाणे रेल्वे ही त्यावेळची विशेष रेल्वे म्हणून ओळखली जायची. पुढे इंग्रजांना या रेल्वेचा विस्तार करावासा वाटला आणि मुंबई ठाणे रेल्वे ही पुण्यापर्यंत आणायची असं त्यांनी ठरवलं. तो काळ होता १८५३ चा.पण हे सहज इतकं शक्य नव्हतं. त्यासाठी इंग्रजांनी एक समिती नेमली आणि या समितीकडे पुण्यापर्यंत जाणाचा लोहमार्ग शोधण्याचे काम दिले. या समितीने खंडाळा घाटापर्यंत मार्ग शोधला पण पुढे काही मार्ग मिळेना. अखेर काम थांबवायचं ठरविण्यात आलं पण इंग्रजांचा लोहमार्गाचा शोध सुरू होता.इंग्रज काहीतरी शोधत आहे हे एका शिंगरोबा नावाच्या व्यक्तीला कळले. त्यामुळे उत्सूकतेने शिंगरोबाने इंग्रजांना विचारले, " मी बघतोय, तुम्ही बऱ्याच दिवसापासून काहीतरी शोधताय. मी काही मदत करू शकतो का?"

त्यावेळी इंग्रजांनी सांगितले की त्यांना मुंबई -ठाणे रेल्वे पुण्यापर्यंत वाढवायची आहे. त्यासाठी लोहमार्ग शोधतोय पण सापडत नाही. त्यावेळी शिंगरोबा म्हणाले ''एवढच.. चला ! मी दाखवतो रस्ता..."शिंगरोबा रस्ता काढात काढत पुढे चालत राहिले आणि त्यांच्या मागे इंग्रज चालत होते. अश्याप्रकारे शिंगरोबाने इंग्रजांना सोपा मार्ग दाखवून दिला. त्यावर खुश होऊन शिंगरोबाला इंग्रजाने तुला काय देऊ, असे विचारले.तेव्हा शिंगरोबा म्हणाले, " मला काहीही नको फक्त माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या....! हे शब्द कानी पडताच इंग्रजांनी गोळी झाडून शिंगरोबाचा घात केला. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी एका धनगरांचा बळी गेला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे मंदिर बांधण्यत आलंय.आजही शिंगरोबांनी दाखवलेल्या मार्गाला शिंगरोबा नाव द्या किंवा शिंगरोबांच्या नावाने एखादी एक्सप्रेस सुरू करा मागणी केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने