मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत असतात. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे ते सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात.इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात.
आज मात्र त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. तो म्हणजे पोंक्षे पुन्हा एकदा अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये गेले आहेत. आणि एक खास आठवण त्यांनी शेयर केली आहे.शरद पोंक्षे यांनी अनेकदा अंदमान येथील सेल्युलर जेलचा व्हिडिओ शेयर केला आहे. जय जेलमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं होतं. त्या जेलमध्ये राहून तुरुंगवास भोगनं किती कठीण आहे याची अनेकदा जाणीव पोंक्षे यांनी करून दिली आहे.सावरकर या जेलमध्ये असताना नेमकं काय झालं, हे सांगणारा एक व्हिडिओ पोंक्षे यांनी आज पोस्ट केला आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधुन घेतलं आहे.
या व्हिडिओमध्ये अंदमानचे जेल दिसत आहे, सोबत पोंक्षे यांचा आवाज मागे घुमतो आहे. पोंक्षे म्हणतात, ''हे अंदमानचं सेल्युलर जेल आणि या त्या जेलमधल्या सात बाय अकराच्या भयानक कोठड्या.. याच कोठडीच्या भीतींना कागद बनवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहा हजार ओव्यांचं 'कमला' सारखं महाकाव्य रचलं.. धन्य ते सावरकर..''शरद पोंक्षे आणि सावरकर हे एक वेगळच समीकरण आहे. नुकतेच ते भाजप आणि शिंदे गटाच्या 'सावरकर गौरव यात्रेतही सहभागी झाले होते. तर आपल्या भाषणातून ते कायमच सावरकरांचे विचार जागवत असतात.