शरद पवारांनी पुन्हा मारली पलटी, अदानी प्रकरणात भाषा झाली मवाळ!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून भारतीय राजकारणात सक्रीय असून लोकशाहीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचे मत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यातच काँग्रेसक आणि राहुल गांधी यांनी हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी करत आहेत. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केले होते.हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीची मागणी अनावश्यक असल्याचं पवार यांनी म्हटलं. जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचे बहुमत राहिलं. त्यामुळे सत्य बाहेर येऊ शकत नाही, अस मत पवार यांनी व्यक्त केल होतं.मात्र त्यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले, अदानी मुद्द्यावरून आमच्या मित्र पक्षांची मतं वेगळी आहेत, मात्र आम्हाला विरोधकांमध्ये एकोपा ठेवायचा आहे. अदानी मुद्द्यावर माझं मत त्याठिकणी मांडलं मात्र आमच्या सहकाऱ्यांना वाटत असेल तसं, JPC च्या चौकशीचा मी विरोध करणार नाही. विरोधकांच्या एकीवर दुष्परिणाम होवू नये म्हणून आम्ही आग्रह धरणार नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

अदानी प्रकरणावर शरद पवार काय म्हणाले होते?

विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले. या फर्मची पार्श्वभूमी कुणालाच माहित नाही, आम्ही त्यांचे नावही ऐकले नाही. या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच हिंडेनबर्ग हे परदेशी कंपनी आहे या कंपनी बद्दल मी कधीही ऐकलेले नाही.हिंडनबर्ग अहवालापेक्षा आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल हा आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. याचा विरोधकांच्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही. विरोधकांनी एका कंपनीने दिलेल्या अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले. या फर्मची पार्श्वभूमी कुणालाच माहित नाही, आम्ही त्यांचे नावही ऐकले नाही.या प्रकरणात एका औद्योगिक समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच हिंडेनबर्ग हे परदेशी कंपनी आहे या कंपनी बद्दल मी कधीही ऐकलेले नाही. हिंडनबर्ग अहवालापेक्षा आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल हा आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे. ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. याचा विरोधकांच्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने