नॉर्वि: लहान मुलांना १० मिनिटं घरात बसवणं अशक्य आहे, एकदा का शाळेतून आले कसं तरी आवरायच आणि मग थेट बाहेर मित्रांसोबत खेळायला जायचं हा जणू त्यांचा रोजचा उपक्रमच झाला आहे.अनेकदा तर पालकांचही मुलांना भेटणं कठीण होऊन बसत, पण अशातही पालक विचार करता की जाऊदेत, निदान घरात बसून टीव्ही आणि फोनमध्ये तर डोकं नाहीये लावत मग असुदेत.
शिवाय लहान मुलांच वयच मुळात खेळायचं आणि बागडायच असतं म्हटल्यावर त्यांना उगाच घरात बसवून ठेवण्यात अर्थ तरी काय? बरोबर आहे ना? मुलांच्या पालकांचीही इच्छा असते की, आपल्या मुलाने आपल्या मित्रांसोबत बाहेर मोकळ्या वातावरणात खेळावे जेणेकरून तो केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहील.पण जगात असे एक गाव आहे जिथे मुलांचे पालक मुलांना घराबाहेर पडू देत नाहीत. आपल्या मुलाने घरातच रहावे असे त्यांना वाटते अन् त्यासाठी अक्षरशः घरचे लोकं त्यांना घरात डांबून ठेवतात.तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण होत असेल की मुलांना बाहेर का जाऊ दिले जात नाही, चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण, जे कळल्यावर तुम्हालाही पालकांची बाजू पटेल...
नॉर्विच मधील गाव
जगातील हे अनोखे ठिकाण म्हणजे युनायटेड किंगडममधील नॉर्विच इथे असलेले एक गाव. थॉर्प हॅम्लेट असे या अनोख्या गावाचे नाव आहे. जिथे आईवडील मुलांना इच्छा असूनही घराबाहेर पडू देत नाहीत.या गावाबाबत सांगितले जात आहे की, हे गाव अतिशय असुरक्षित ठिकाणी वसले आहे. त्यामुळे मुले घरी परततील की नाही, अशी भीती पालकांच्या मनात कायम आहे.
थॉर्प हॅम्लेट गावात काय धोका आहे
गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, गावातील घरांबाहेरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे १२-१५ फुट खोल आहेत आणि यांना सिंकहोल म्हणून संबोधले जाते. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे.त्यामुळे या अपघाताचा बळी कोण होणार, अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक आपल्या मुलांना घराबाहेर पडू देत नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावातील रहिवाशांनी सरकारला या क्षेत्राच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे.
लोकांना सिंकहोल्सबद्दल कसे कळले
रहिवाशांपैकी एकाच्या घराबाहेरील बागेतील एक झाड अचानक जमिनीवर पडून १२ फूट खोल खड्डा झाल्यामुळे त्यांना या सिंकहोलची माहिती मिळाल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे.या अपघातानंतर ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, सध्या शासनाने खड्डे बुजवण्याच्या बाजूने रेझिस्टन्सही बसवले आहेत. पण तरीही गावे खूप घाबरलेली आहेत. सिंकहोलमुळे आमचे जीवन कधीही संपुष्टात येऊ शकते, असे इथे राहणारे लोक सांगतात.