उद्धव ठाकरेंच्या आजारपणात आदित्य यांनी CMपदासाठी षडयंत्र रचलं पण...; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत दररोज भाजपसह एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करतात. त्याला आता भाजपने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून नितेश राणे राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसतात. आज नितेश राणे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत धक्कादायक दावा केला आहे.काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचं 'सामना'मधून करण्यात आलेल्या समर्थनावर नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊतांनी दुसऱ्यांनी केलेल्या टीकेवर आग्रलेख लिहने बंद करून आदित्य ठाकरेंच्या लग्नाबाबत आग्रलेख लिहावा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.उद्धव ठाकरेंचा आदेश त्यांचा शिपाई देखील मानत नाही. उद्धव ठाकरे यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी ते रुग्णालयात दाखल होते, तेव्हा आदित्य ठाकरे आणि त्याचा मित्र वरुण सरदेसाईसह टोळी डावोसच्या नावाने परदेशात मजा मारत होते, असा दावा नितेश राणे यांनी केला. तसेच उद्धव ठाकरेंची तब्येत बरी होणार नाही, असं सांगत आदित्य ठाकरे स्वत: मुख्यमंत्री होण्याचे प्रयत्न करत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केल्याने ते थांबल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.दरम्यान जसलोकच्या कोणत्या खोलीत याबाबत बैठका झाल्या, हे मी सीसीटीव्हीसह दाखवू शकतो, त्यामुळे समर्थनाची गोष्ट करू नाही. असं म्हणत, वडील आजारी असताना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहणारा आदित्य ठाकरेंबाबत ही माहिती खरी आहे की, खोटी आहे, राऊतांनी सांगावं, असंही राणे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने