टाटांची TCS पुन्हा नंबर 1 वर; भारतात काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्यांची लिस्ट जाहीर

मुंबई: टाटा समूहाची भारतातील सर्वात जुन्या औद्योगिक समूहांमध्ये गणना केली जाते. याशिवाय अनेक कारणे आहेत, जी लोकांना टाटा आणि टाटा कंपन्यांशी जोडतात.प्रोफेशनल सोशल नेटवर्क लिंक्डइनच्या ताज्या अहवालात असेच एक कारण समोर आले आहे. LinkedIn ने भारतात कामाचे सर्वोत्तम वातावरण देणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. टाटा समूहाच्या कंपनीने या प्रकरणात सर्वांना मागे टाकले आहे.

TCS नंतर 'या' कंपन्या :

LinkedIn च्या या अहवालात देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी काम करण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी मानली गेली आहे.LinkedIn ने तयार केलेल्या भारतातील टॉप कंपन्यांच्या 2023 च्या यादीत TCS पहिल्या स्थानावर आहे, तर Amazon दुसऱ्या आणि Morgan Stanley तिसऱ्या स्थानावर आहे.

आयटी कंपन्यांचे वर्चस्व कमी :

गेल्या वर्षी या यादीत तंत्रज्ञान कंपन्यांचा दबदबा होता, मात्र यंदा तो कमी झाला आहे. या वर्षी आर्थिक सेवा, तेल आणि वायू, व्यावसायिक सेवा, उत्पादन आणि गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांचाही या यादीत समावेश आहे.अहवालानुसार, यादीतील 25 पैकी 10 कंपन्या वित्तीय सेवा, बँका, वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. यामध्ये मॅक्वेरी ग्रुप पाचव्या, HDFC बँक 11व्या, मास्टरकार्ड 12व्या आणि UB 14व्या स्थानावर आहे.टाटा समूहाची भारतातील सर्वात जुन्या औद्योगिक समूहांमध्ये गणना केली जाते. याशिवाय अनेक कारणे आहेत, जी लोकांना टाटा आणि टाटा कंपन्यांशी जोडतात.प्रोफेशनल सोशल नेटवर्क लिंक्डइनच्या ताज्या अहवालात असेच एक कारण समोर आले आहे. LinkedIn ने भारतात कामाचे सर्वोत्तम वातावरण देणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. टाटा समूहाच्या कंपनीने या प्रकरणात सर्वांना मागे टाकले आहे.TCS नंतर 'या' कंपन्या :

LinkedIn च्या या अहवालात देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी काम करण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी मानली गेली आहे.LinkedIn ने तयार केलेल्या भारतातील टॉप कंपन्यांच्या 2023 च्या यादीत TCS पहिल्या स्थानावर आहे, तर Amazon दुसऱ्या आणि Morgan Stanley तिसऱ्या स्थानावर आहे.

आयटी कंपन्यांचे वर्चस्व कमी :

गेल्या वर्षी या यादीत तंत्रज्ञान कंपन्यांचा दबदबा होता, मात्र यंदा तो कमी झाला आहे. या वर्षी आर्थिक सेवा, तेल आणि वायू, व्यावसायिक सेवा, उत्पादन आणि गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांचाही या यादीत समावेश आहे.अहवालानुसार, यादीतील 25 पैकी 10 कंपन्या वित्तीय सेवा, बँका, वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. यामध्ये मॅक्वेरी ग्रुप पाचव्या, HDFC बँक 11व्या, मास्टरकार्ड 12व्या आणि UB 14व्या स्थानावर आहे.

लिंक्डइन इंडियाचे एमडी यांनी ही माहिती दिली :

लिंक्डइन इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका निरजिता बॅनर्जी म्हणाल्या, "एखाद्या विशिष्ट कंपनीमध्ये स्वारस्य असलेले लोक आता LinkedIn वर पोस्ट आणि संबंधित कौशल्ये सहजपणे शोधू शकतात.तेथे काम करणारे त्यांचे संपर्क शोधू शकतात आणि कंपनीला 'फॉलो' करू शकतात. भविष्यात येणाऱ्या संभाव्य संधींबद्दलही तुम्हाला माहिती मिळू शकते. शीर्ष कंपन्यांची ही यादी सर्व स्तरावरील व्यावसायिकांना नोकरीच्या संधी शोधण्यासाठी उपयुक्त आहे."

असा तयार झाला रिपोर्ट :

ही यादी लिंक्डइनच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित आहे. आठ मानकांच्या आधारे ते तयार करण्यात आले आहे.यामध्ये प्रगती, कौशल्य विकास, कंपनी स्थिरता, बाह्य संधी, कंपनी संबंध, लैंगिक विविधता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि देशातील कर्मचारी उपस्थिती यांचा समावेश होतो.यामध्ये 20व्या क्रमांकावर ड्रीम11 आणि 24व्या क्रमांकावर असलेल्या गेम्स 24x7 यासारख्या कंपन्यांचा या यादीत प्रथमच समावेश करण्यात आला आहे.यावरून गेमिंग क्षेत्राची वाढती लोकप्रियता दिसून येते. टॉप 25 कंपन्यांच्या या यादीत प्रथमच 17 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने