काँग्रेसला आली जाग; हायकमांडचा दिग्गज नेता उद्धव ठाकरेंची भेट घेणार

मुंबई: महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली अचानक झालेल्या भेटीमुळे राजकारणात काही घडणार का अशा चर्चा पाहिला मिळाल्या मात्र भेटी मागील कारण समजू शकलं नाही.दरम्यान आता काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे-पवार भेटीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे राज्यचं लक्ष लागून राहिलं आहे. पुढील आठवड्यात ही भेट होणार आहेत. तसेच राहुल गांधी यांची सभा देखील नागपूरमध्ये होण्याची शक्यता आहे.सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सावरकर यांच्या विषयी चालू असलेल्या वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल दीड तास चर्चा झाली, या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.

पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने