''रंग अन् वजनावरुन अर्पिताला हिणवतात', सलमानच्या मेव्हण्यान नेटकऱ्यांना सुनावलं

मुंबई: सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माने याने काही वर्षांपूर्वीच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 2018 मध्ये 'लवयात्री' या चित्रपटाद्वारे त्याने मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्री केली. त्यानंतर तो सलमानसोबत अंतिममध्येही दिसला होता. नुकताच आयुषच्या आगामी 'रुस्लान' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.आयुष शर्मा आणि त्याची पत्नी म्हणजेच सलमानची बहिण अर्पिता नेहमीच चर्चेत असतात. त्यांना दोन मुले आहेत. दरम्यान नुकतच आयुष त्याची पत्नी अर्पिताबद्दल बोलला. खरतरं अर्पिता हिला बऱ्याच वेळा सोशल मिडियावर तिच्या रंगावरुन आणि वजनामुळे ट्रोल केलं जातं.TedX प्लॅटफॉर्मवर बोलतांना पत्नी अर्पिताला ट्रोल करणाऱ्यांना आयुषने सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला की, जेव्हा जेव्हा अर्पिताचा फोटो इंटरनेटवर येतात तेव्हा तिला वाईट पद्धतीने ट्रोल केले जाते.तिच्या रंग आणि वजनामुळे लोक तिच्यावर कमेंट करतात आणि तिला वाईटसाईट बोलतात. पण अर्पिता या गोष्टी मनावर घेत नाही. तिला स्वतःचा अभिमान आहे आणि तिला तिच्या मर्जीने जीवन जगायला आवडते.यावेळी बोलतांना आयुष म्हणाला, माझ्या पत्नीला तिच्या वजनामुळे सतत ट्रोल केले जाते. सेलिब्रेटी म्हणून तिने लठ्ठ असू नये तिने ड्रेसिंग स्टाइलकडे लक्ष दिले पाहिजे. विशिष्ट पद्धतीनेच राहिली पाहिजे. तिचा रंग थोडा डार्क आहे. प्रत्येक वेळी तिचा फोटोव्हायरलवर लोक तिला तिच्या त्वचेच्या रंगाची आठवण करून देतात.

याचबरोबर आयुषने ट्रोलर्सलाही चांगलच सुनावल आयुष म्हणाला की, 'आता सौंदर्य हे केवळ आंतरिक राहिलेले नाही. आपण एक व्यक्ती म्हणून किती सुंदर आहात हे कोणालाही जाणून घ्यायचं नाही, लोकांना तुम्हाला फक्त चेहऱ्यावरून सुंदर बघायचे आहे.'आपल्या पत्नीच कौतुक करत आयुष म्हणला की, "मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे कारण ती स्वतःमध्ये खूप कम्फर्टेबल आहे. ती ट्रोलिंगचा तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ देत नाही. अर्पिता तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगते आणि तिला आयुष्यातून काय हवे आहे हे तिला माहीत आहे.'पुढे तो म्हणतो की, 'अर्पिता मला अनेक वेळा सांगते, मी सेलिब्रिटी नाही. मी सेलिब्रिटी होण्यासाठी काहीही केले नाही. मी कधीही कॅमेऱ्यासमोर काम करणार नाही. म्हणूनच मी जशी आहे तशीच राहीन. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे.'अर्पिता आणि आयुष 2014 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना दोन गोंडस मुल आहेत. ते ऐकमेकांसोबत खुप खुश आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने