पराभवाची जबाबदारी यांचीच! धोनीने कोणाच्या डोक्यावर फोडलं खापर?

मुंबई: आयपीएल 2023च्या 17व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव करून एक रोमांचक सामना जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना राजस्थानने 8 बाद 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ केवळ 172 धावा करू शकला. या सामन्यानंतर CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं.सीएसकेच्या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी म्हणाला ,की मला वाटते की आम्हाला मधल्या षटकांमध्ये आणखी काही स्ट्राइक रोटेशनची आवश्यकता आहे. स्पिनर्ससाठी फारसे काही नव्हते परंतु त्यांच्याकडे अनुभवी फिरकीपटू होते, आम्ही स्ट्राइक रोटेट करू शकलो नाही. ते इतके अवघड नव्हते. आम्ही शेवटची जोडी असल्याने अंतर गाठले हे चांगले झाले.धोनी पुढे म्हणाला की, जेव्हा स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचते तेव्हा त्याचा रनरेटवर खरोखर परिणाम होतो. तुम्ही मैदान बघा, बॉलर बघा आणि बॉलर काय करण्याचा प्रयत्न करत आहे, मग फक्त उभे राहून त्यांच्या चुका होण्याची वाट बघा, त्यांनी चांगल्या गोलंदाजी केली.राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना सीएसकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा स्टार सलामीवीर गायकवाड अवघ्या 8 धावा करून बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉनवे (50) आणि अजिंक्य रहाणे (31) यांनी मोठी भागीदारी करत सीएसकेला सामन्यात परत आणले. मात्र यानंतर मधल्या फळीत फलंदाजीला आलेले शिवम दुबे, मोईन अली आणि अंबाती रायडू यांना काही विशेष करता आले नाही.अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर जबाबदारी आली. CSK ला शेवटच्या 2 षटकात 40 धावांची गरज होती. धोनी आणि जडेजा जोडीने जेसन होल्डरच्या षटकात 19 धावा जमवल्या. संदीप शर्माने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी पेलली आणि त्याला 21 धावा वाचवायच्या होत्या. या षटकाच्या दुसऱ्या बाजूला तिसऱ्या चेंडूवर संदीपने षटकार ठोकला आणि सामना सीएसकेच्या हातात आला. पण शेवटी संदीपने दोन यॉर्कर फेकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धोनी 17 चेंडूत 32 आणि जडेजाने 15 चेंडूत 25 धावा करून नाबाद राहिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने