नृत्य हे आध्यात्मिक उपासनेचे साधन अन् सकारात्मक उर्जेचा उत्तम स्त्रोत

दिल्ली: प्रत्येक व्यक्तीला विविध क्रिया, उपक्रमांमधून आनंद मिळतो. मात्र, नृत्य ही एक अशी कला आहे जी केवळ नर्तकालाच नव्हे तर नृत्य पाहणाऱ्यालाही अतिशय सुखद असा आनंद देते. नृत्य करताना नर्तकाचे संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा एकात्म होतो. यामुळेच त्रेता युगापासून नृत्य हे आध्यात्मिक उपासनेचेही साधन म्हणून ओळखल्या जात असल्याचे मत नृत्यांगणा पूजा हिरवडे यांनी व्यक्त केले.नृत्याची शक्ती ही अपार आहे. नृत्य करताना नर्तकांचे इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण असते. नृत्य त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या दरम्यान, नृत्य करणाऱ्याला परम आनंदाचा अनुभव येतो. त्यामुळे, नृत्य ही एक आनंद देणारी कला आहे. ‘नृत्यामुळे व्यक्तीला आनंद मिळतो’ यावर विज्ञानानेही शिक्का मोर्तब केले आहे.नृत्यामुळे व्यक्ती जीवनातील समस्या विसरून जातो. यामुळे, जैविक प्रणालीवर सकारात्मक परिणाम होत मानवाला आरोग्यदायी जीवन लाभते. नाट्यशास्त्रानुसार, लोकांना नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यासाठी नृत्याची निर्मिती करण्यात आली. त्रेता युगात जनतेला दुःखाने आणि जीवनातील अनेक नकारात्मक गोष्टींनी ग्रासले होते. अशा नकारात्मकतेला दूर लोटण्यासाठी भगवान इंद्र आणि इतर देवांनी ब्रह्मदेवाला पाचवा वेद तयार करण्याची विनंती केली. ब्रह्मदेवाने ४ वेदांमधून विविध घटक घेतले आणि पाचवा वेद तयार केला. यालाच नाट्यवेध म्हणतात, अशी माहितीही त्यांनी दिली. 

'आमच्या नृत्य वर्गामध्ये एक परदेशी पाहुणा आला होता. आमची एक तासाची नियमित नृत्य तालीम पाहिल्यानंतर त्याने मला उत्साहाने विचारले ‘तुम्ही तुमच्या वर्गात फक्त सुंदर दिसणाऱ्या मुलींनाच प्रवेश देता का?’ मी म्हटले, नृत्य आणि नृत्यावरचे प्रेमच त्यांना सुंदर बनवते.' नृत्य ही मनाला आनंद देणारी एक उत्तम अॅक्टिव्हीटी आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा वेळ मिळेल तेव्हा नृत्याचा सराव हा करायला हवा. त्याने तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले राहील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने