नानीचा 'दसरा' आता OTT वरही गाजणार! जाणुन घ्या कुठे आणि केव्हा पाहता येईल

मुंबई:  साउथ सुपरस्टार नानीचा 'दसरा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही दिवस का होईना पण चांगला धुमाकूळ घातला. नानीने अजय देवगणच्या भोला या चित्रपटाला चांगलीच टक्कर दिली. हा चित्रपट कन्नड प्रेक्षकांना खुपच आवडला.या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असून नानीच्या चित्रपटाने आतापर्यंत जागतिक स्तरावर १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे अजूनही ही कमाई सुरुच आहे.ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल त्याच्यासाठी चांगली बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट लवकरच ओटोटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.यात 'दसरा' चित्रपटाच्या बजेट खर्चाच्या अर्ध्या खर्च निघत आहे. यासोबतच ओटीटी व्हर्जनमध्ये ते सीन देखील समाविष्ट केले जातील, जे थिएटरमध्ये रिलीज करण्यात आले होते.नानीच्या या अॅक्शन ड्रामाने अपेक्षे इतकी कमाई केली नसली तरी या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने भारतात सुमारे 77 कोटी रुपयांची कमाई केली आहे.श्रीकांत ओडेला दिग्दर्शित 'दसरा' चित्रपटात नानी, कीर्ती सुरेश यांच्यासोबत दीक्षित शेट्टी यांनीही महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत. हा पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट हिंदी तसेच तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने