आता जमादारांना सुपरवायझर म्हटलं जाणार, CJI चंद्रचूड यांचा निर्णय

दिल्ली: भारताचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी ६ दशकांहून जुन्या नियमांमध्ये सुधारणेचा निर्णय घेतला आहे. यातच सर्वोच्च न्यायालयात जमादार पदांवरील कर्मचाऱ्यांना सुपरवायझर संबोधलं जाणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे नवे नियम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रेणीच्या पदांना लागू होणार आहे. शनिवारी याविषयाची अधीसूचना जारी करण्यात आली होती.सीजेआय चंद्रचूड यांनी CJI The Supreme Court Officers and Servants (Conditions of Service and Conduct) Rules 1961 मध्ये सुधारणा केली आहे. जमादार हा शब्द बऱ्याच पूर्वीपासून वापरला जातो. कार्यालयीन स्वच्छतेची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्याना जमादार म्हटले जाते. यानित्ताने या श्रेणीकडे लक्ष वेधण्यात आले आहे.वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आवाहन करण्यात आले

भारताच्या सरन्यायाधीशांनी शुक्रवारी खटल्याशिवाय विवाद निराकरण करण्यासाठी एक मार्ग म्हणून मध्यस्थीचा अवलंब करणे आणि प्रोत्साहन देण्याचे समर्थन केले. यामुळे न्यायालयांवरील भार कमी होईल आणि विरोधी निर्णयांऐवजी समर्थन प्रदान करण्याची क्षमता देखील आहे, असे ते म्हणाले.CJI म्हणाले की सरकार यावर सर्वाधिक वाद घालत आहे. उलट त्यांनीच मित्राच्या रुपात येणं आवश्यक आहे. ते म्हणाले की जर सरकारने मध्यस्थी प्रक्रियेचा पर्याय निवडला तर सरकार स्वतः विरोधी नाही असा एक संदेश जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने