Ranveer ला सोडून एकटी व्हॅकेशनवर गेलीय दीपिका, फोटो समोर आले तर पुन्हा रंगली घटस्फोटाची चर्चा..

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग यांच्या वैवाहिक आयुष्या संबंधित अनेक वावड्या गेल्या काही दिवसांपासून उठताना दिसत आहेत. सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे की दोन स्टार्समध्ये सध्या सगळं काही ठीक नाही.आता याच बातम्यां दरम्यान दीपिका पदूकोण एकटीच व्हॅकेशनवर गेल्यनं अनेकांना थोडं खटकलं आहे. दीपिका पदूकोणचे भूतान व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत,ज्यांना पाहिल्यावर लोकांमध्ये पुन्हा तिच्या आणि रणवीरच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.दीपिका 'फायटर' सिनेमाचं शेड्युल आटपल्यावर 'पठाण' सिनेमाचं यश सेलिब्रेट करण्यासाठी थेट भूतानला व्हॅकेशनसाठी पोहोचली होती. अभिनेत्रीनं तिथे आपल्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक केले जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.दीपिका पदूकोणच्या भूतान व्हॅकेशनच्या फोटोंवर अनेक लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी तर एकच प्रश्न विचारला आहे की, 'रणवीर सिंग कुठे गायब आहे?' रणवीर सिंग शिवाय दीपिकाचं व्हॅकेशन एन्जॉय करणं लोकांना मुळीच आवडलेलं नाही.

दीपिका पदूकोण लवकरच अनेक बड्या सिनेमातून धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार,दीपिका प्रभास आणि अमिताभ बच्चनसोबत 'प्रोजेक्ट के' मध्ये दिसणार आहे. तसंच,हृतिक रोशन सोबत 'फाइटर' सिनेमात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. 'फाइटर' सिनेमा २५ जानेवारी,२०२४ रोजी रिलीज होईल.तर रणवीर सिंगच्या आगामी सिनेमांवर नजर टाकली तर त्याचे काही खास सिनेमे पाइपलाइनमध्ये दिसत नाहीत. रिपोर्ट्अनुसार, रणवीरकडे सध्या फक्त रोहित शेट्टीच्या पोलिस कॉप सीरिजच्या एका सिनेमाची ऑफर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने