दिलजीतचा देसी जलवा! कॅलिफोर्नियातील संगीत महोत्सवात गोऱ्यांना नाचवलं आपल्या तालावर...

मुंबई:  दिलजीत दोसांझ ने अल्पावधितच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो सर्वोत्कृष्ट पंजाबी गायक आहे. दिलजित त्याच्या आवाजासाठी आणि वक्तव्यासाठी ओळखला जातो.पंजाबपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत दिलजीतच्या आवाजाची क्रेझ आहे आणि आता त्याने आपल्या गाण्यांने सगळ्या जगाची मने जिंकली आहेत. दिलजीतने कॅलिफोर्नियातील कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केले आहे.दिलजीत दोसांझने रविवारी कॅलिफोर्नियातील कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाईव्ह परफॉर्म केले. वार्षिक यूएस म्युझिक अँड आर्ट फेस्टिव्हलमध्ये स्टेजवर परफॉर्म करणारा दिलजीत दोसांझ हा पहिला पंजाबी कलाकार आहे. आलियाने उडता पंजाबमध्ये दिलजीत दोसांझसोबत काम केले आहे.दलजीतच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विषेश म्हणजे त्याने यावेळी भारतीय पोशाख परिधान केला होता. दिलजीत काळ्या कुर्ता-तंबामध्ये दिसला. त्याचा देसी लूक तेथील लोकांना आवडला होता. या मोठ्या कार्यक्रमाच्या गायकाचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.


दिलजीतच्या या मोठ्या कामगिरीबद्दल बॉलिवूड स्टार्सनी त्याचे अभिनंदन केले आहे. सोनम कपूर, करीना कपूर खान आणि आलिया भट्ट यांनी त्याचे कौतुक केले आहे.आलिया भट्टने याला एपिक म्हटले आहे. त्याचवेळी सोनम कपूर म्हणते की तिला तिथे उपस्थीत राहून ते बघायचं होतं. करीना कपूरनेही दिलजीत दोसांझचे कौतुक केले.दिलजीतशिवाय पाकिस्तानी गायक अली सेठीनेही कॅलिफोर्नियातील कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केले. गाण्याव्यतिरिक्त दिलजीत पंजाबी चित्रपटांमध्येही दिसतो. त्याला अभिनयाचीही आवड आहे.दिलजीतने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘चमकिला बायोपिक’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. इम्तियाज अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने