पाणी मागणाऱ्यांना अटक करता, मोगलाई आहे का? ; ठाकरे गटाचा संतप्त सवाल!

नागपुर: खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या ६९ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली.दरम्यान, त्यांची ही यात्रा नागपुर येथे थांबवण्यात आली. यावेळी नितीन देशमुखांना पोलिसांनी तब्यात घेतले आहे. नितीन देशमुख यांना चक्क उचलून नेण्यात आले. यावर खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत.देवेंद्र फडणवीस का भीती आहेत. कारण तुम्ही पाप करत आहात. पाणी मागणाऱ्या आमदारांना तुम्ही ताब्यात घेतले. ही काय औरंगजेबाचे सरकार आहे का? पाणी मागणाऱ्यांना अटक करता, मोगलाई आहे का?. शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची माणूसकी मेली आहे का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.संजय राऊत म्हणाले, अकोला जिल्ह्यात पाण्याची समस्या तिव्र आहे. उद्धव ठाकरे यांनी यासाठी योजना सुरू होती. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला, सध्याच्या सरकारने स्थगिती दिली आहे.
नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस अकोल्यात असताना नितीन देशमुख यांनी संघर्ष यात्रा काढली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देशमुखांसह हजारो कार्यकर्त्यांवर जमाव बंदी प्रकरणी गुन्हे दाखल केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने