सैराटच्या रिमेकचा सिक्वेल येणार? करण जोहर म्हणतोय,..

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात नागराज मंजुळेच्या सैराटने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर बॉलिवूडनेही या चित्रपटाचा रिमेक तयार केला. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध निर्माता करण जोहरने काही वर्षांपूर्वी सैराटचा रिमेक तयार केला ज्याच नाव 'धडक' होतं.या चित्रपटातुन जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या स्टार किड्सला करणने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. या चित्रपटात या दोन्ही स्टार्सची शानदार एन्ट्री झाली, प्रेक्षकांनीही याचित्रपटाला समिश्र प्रतिसाद दिला. तर काहींनी दोघही स्टार किड असल्यामुळे त्याच्यावर टिकाही केली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला.मात्र आता करण जोहरने धडक 2 ची तयारी सुरु केली असल्याची चर्चा रंगली होती. करण जोहरच्या बॅनरखाली बनणाऱ्या धडक 2 चे दिग्दर्शन शाझिया इक्बाल करणार आहे.तर या चित्रपटातुन जान्हवी आणि ईशानचा पत्ता कट झाला असून त्यांच्याजागी सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांना साइन केले आहे अशाही चर्चा रंगल्या. त्यामुळे या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सूकता लागली होती.मात्र याप्रकरणाबद्दल अधिकृत घोषणा झाली नसल्याने या अफवा असल्याचं बोललं जात होतं. त्यातच करण जोहरने या चित्रपटाबद्दल स्पष्ट केलं आहे. करणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलयं की तो धडक 2 या नावाचा चित्रपट तयार करत नाही आहे. त्याने या सर्व बातम्या वाचल्या आहेत. त्यामुळेच त्याने हे स्पष्ट केलं की धर्मा प्रोडक्शन अशा नावाचा कोणताही चित्रपट तयार करत नाही आहे.

तब्बल 7 वर्षांनंतर करण जोहरने पुन्हा एकदा दिग्दर्शनात वापसी करणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून तो या वर्षी दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. यात रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने