ठाकरे गटाला मोठा दिलासा! 'शिवसेनेसोबत काहीही संबंध नाही' म्हणत, सुप्रिम कोर्टाने 'ती' याचिका फेटाळली

मुंबई: निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव दिलं आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णया नंतर उद्धव ठाकरे गटाला हा मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाला शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा, आणि पक्षाचा निधी मिळावा, यासाठी आशिष गिरी नावाच्या वकीलाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे. आशिष गिरी यांचा शिवसेनेसोबत काहीही संबंध नाही असं म्हणत ही याचिका कोर्टाने फोटाळली आहे.शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. याचा आधार घेत वकील. आशिष गिरी यांच्याकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये शिवसेनेच्या संपत्तीवर दावा करण्यात आला होता.तसेच शिवसेना भवन, मुंबईमधील शिवसेनेच्या शाखा आणि पक्षाचा पक्षनिधी शिंदे गटाच्या शिवसेनेकडे वर्ग करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली होती.

मुळ शिवसेनेची मोठा पक्षनिधी आहे. याशिवाय शिवसेनेच्या अनेक संस्था, कार्यालयं, शाखा आहेत. त्यावर कोणाचा हक्क याकडे न्यायालय याकडे कशा प्रकारे पाहतं हे महत्त्वाचं आहे. शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.त्यामुळे शिवसेनेच्या नावे बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे तो पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.मात्र आता सुप्रिम कार्टाने ही याचिका अखेर फेटाळली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने