'राजाराम'चा गुलाल उधळल्यानंतर महाडिकांची कर्नाटकात एन्ट्री; 'या' उमेदवाराचा केला प्रचार

कोल्हापूर: कोल्हापूर येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही गुलाल उधळून विरोधकांना धोबीपछाड केलं आहे. आता निपाणीत मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा विश्वास खासदार धनंजय महाडिक  यांनी व्यक्त केला.मांगुरात भाजप प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री जोल्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खासदार महाडिक म्हणाले, मंत्री जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी मंत्री जोल्ले म्हणजेच भाजप मतदान करावे. दहा वर्षात जनतेचा जोल्ले यांनी विश्वास सार्थ ठरविला आहे. निपाणीचा चौफेर विकास केल्याची चर्चा नजीकच्या महाराष्ट्रात होते.केवळ रस्ते गटारी हाच विकास न करता जनतेच्या मूलभूत अडचणी सोडवण्याचे काम जोल्ले यांनी केलं आहे. त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविल्यास निपाणीभागाच्या विकासाला वेग येणार आहे. मंत्री शशिकला जोल्ले म्हणाले, सामाजिक, राजकीयसह शिक्षण, उद्योग, सहकार अशा क्षेत्रात आम्ही करीत आहोत. यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. आजपर्यंत आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करण्याचे धोरण ठेवलं आहे.वृषभ जैन, विशाल सुतार यांनीही मनोगत व्यक्त करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केलं. यावेळी निपाणीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक संतोष सांगावकर, भाजप अध्यक्ष पवन पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने-सरकार, मांगुर भाजपाध्यक्ष मल्लाप्पा चौगुले, भैया बोधले, एपीएमसी सदस्य नीतेश खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष शीतल बाचणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महावीर चौगुले यांनी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने