जुन्या सायकलला घरच्या घरीच बनवा Electric Cycle

मुंबई: देशात दिवसेंदिवस पेट्रेल आणि डिझेलच्या दरात वाढ होत चालली आहे. इंधनाचे हे गगनाला भिडलेले दर पाहून अनेक जण गाडी घ्यावी की नाही या प्रश्नात पडले आहेत. तर दुसरीकडे देशात इलेक्ट्रीक गाड्यांची क्रेझ वाढू लागली आहे. येता काळ हा इलेक्ट्रीक गाड्यांचा असणार आहे.मात्र सध्या या इलेक्ट्रीक कार किंवा ई-स्कूटर आणि ई-बाईकच्या किमतीदेखील जास्त आहेत. त्यामुळे इलेक्ट्रीक व्हेइकलचा पर्याय निवडतानाही अनेकांना विचार करावा लागत आहे. मात्र आता यावर एक तोडगा आहे. तो म्हणजे तुमच्या घरात असलेल्या एका जुन्या सायकलला इलेक्ट्रिक सायकल म्हणजेच e-cycle मध्ये रुपांतरित करणं शक्य आहे.

 


बाजारात ई-सायकलच्या किमती साधारण ३० ते ४० हजार रुपयांच्या घरात आहेत. मात्र एवढे पैसे खर्च न  करताच तुम्ही घरच्या घरी ही सायकल तयार करू शकता. यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला आणि सर्वाच सोपा पर्याय म्हणजे ई-सायकलसाठी लागणारे इलेक्टॉनिक कन्वर्जन किट थेट ऑनलाईन ऑर्डर करणं आणि दुसरा पर्याय म्हणजे सर्व सामानाची जमवाजमव करून ती तयार करणं.पहिल्या पर्यायासाठी तुम्हाला एक इलेक्ट्रिक कन्वर्जन किट ऑनलाईन ऑर्डर करावा लागेल. त्यानंतर एखाद्या सायकल दुरुस्त करणाऱ्या दुकानातून तुम्ही ते सायकलला बसवून घेऊ शकता.जर थोडी मेहनत घेतली तर तुम्ही स्वत:देखील हे किट सायकलला बसवू शकता. हे किट बसवल्यानंतर तुमची जुनी सायकल थेट ई-सायकल बनेल. ही ई-सायकल एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ४० किलोमीटर पर्यंत धावू शकते.स्पीडचा Speed विचार करता ही सायकल २५ किलोमीटर प्रतितास टॉप स्पीडने चालू शकते.

 त्यामुळेच कमी खर्चात तयार केलेली तुमची ही ई-सायकल देखील बाजारातील ३०-४० हजार रुपयांच्या सायकलला टक्कर देऊ शकते.ऑनलाईन अमेझॉनवर ई-सायकलसाठी लागणारं इलेक्टिक कन्वर्जन किट उपलब्ध आहे. ALTER 24V Chain Drive Bicycle CONVERTION KIT Electric Conversion KIT. या किटची किंमत ६१०० रुपये इतकी आहे. तर हे किट बसवण्यासाठी ३००-५०० रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजेच ७ हजार रुपयांच्या आत तुमची ई-सायकल तयार होवू शकते.याशिवाय किट खरेदी न करताही जुन्या सायकलाला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रुपांतरित करणं शक्य आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता आहे. इंस्टालेशन किट, लिथियम बॅटरी, चार्जर, BLDC मोटर आणि एक कंट्रोलर हे साहित्य तुम्हाला लागेल.ब्रशलेस मोटारची किंमत थोडी जास्त असते. या मोटरची स्पीड कमीत कमी ३२८ RPM एवढी असणं गरजेचं आहे. या सर्व वस्तूंसाठी तुम्हाला कमीत कमी ६५०० रुपये खर्च येईल. 


वस्तू खरेदी करताना हे नक्की पडताळा

यावस्तूंची खरेदी करताना काही गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. याच चार्जर हा फास्ट चार्जर असावा. बॅटरी ही आकाराने फार मोठी असू नये तसचं ती २-३ तासांमध्ये चार्ज होईल हे देखील पहा.जर मोटरची क्षमता 6Ah/36V असेल तर बॅटरी पॅकची पावर ही कमीत कमी 36V इतकी असायला हवी. मोटर बॅटरी आणि पावर बटनसोबतच लाइट कंट्रोल करण्यासाठी चार्जर कंट्रोलर गरजेच असतं. यासाठी 4Amp/12V पावर असलेलं चार्जर खरेदी करा.

कसं इन्स्टॉल कराल किट

जर तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू जोडण्याची जाण असेल तर तुम्ही स्वत: जोडणी करू शकता. अथवा तुम्ही मॅकेनिकच्या मदतीने इन्स्टॉलेशन करू शकता. यासाठी तुम्हाला एकूण १०-१२ हजार रुपये खर्च येऊ शकतो.मात्र या खर्चात तुमची जुनी सायकल ईसायकल बनेल. ही सायकल देखील पूर्ण चार्ज झाल्यावर २५kmph ने २० किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.

अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरीच जुन्या सायकलला इलेक्ट्रिक सायकल बनवू शकता. यामुळे पेट्रोल डिझेलवर खर्च न करताच तुम्हाला ई-सायकलच्या मदतीने जवळपासचा फेरफटका मारता येणार आहे.बाजारात भाजी आणायला जाणं, शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एवढचं काय तर २०-२५ किलोमीटर अंतावर तुमचं ऑफिस असेल तर ऑफिसला जाण्यासाठी देखील तुम्ही या सायकलचा वापर करू शकता. यामुळे इंधनावरील खर्च वाचेल शिवाय प्रदूषण नियंत्रणासाठी तुमता हातभारही लागेल. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने