'त्या' वादग्रस्त व्हिडिओवर दलाई लामांचं स्पष्टीकरण, व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले...

नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा वादग्रस्त व्हिडिओ असल्याची चर्चाही सुरु आहेत. या वादावर आता खुद्द दलाई लामा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच जर यातील कृतीमुळं कोणी दुखावले गेले असतील तर याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं दलाई लामा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.दलाई लामा यांनी निवेदनात काय म्हटलंय?

वादग्रस्त व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना दलाई लामा यांच्या कार्यालयानं म्हटलं की, "एक व्हिडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा दलाई लामा यांना मिठी मारता येईल का? असे विचारतो. पण त्यांच्या या कृतीमुळं कोणी दुखावलं गेलं असेल तर तो मुलगा, त्याचे कुटुंबीय तसेच जगभरातील आपल्या अनेक मित्रांची दलाई लामा माफी मागू इच्छितात. दलाई लामा सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यांसमोरही भेटीसाठी आलेल्या सर्वांशीच अगदी निष्पापपणे आणि खेळकरपणे खोडी काढत असतात. पण या घटनेमुळं वाद निर्माण झाल्यानं दलाई लामा खेद व्यक्त करत आहेत,"

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दलाई लामा यांच्याप्रती आदर व्यक्त करताना दिसतो आहे. यावेळी दलाई लामा त्याच्या ओठांच चुंबन घेतात. यानंतर काही वेळाने ते त्याला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दलाई लामा यांच्या या व्हिडिओनंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकात्मक भाष्य व्हायला लागलं. माध्यमांनीही याची दखल घेत बातम्या दिल्यानंतर तो विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. त्यामुळं अखेर दलाई लामा यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने