'तू चुकूनही सलमानसोबत लग्नाचा विचार करु नकोस!' जुहीच्या कुटूंबियांचा का होता विरोध?

मुंबई: इतक्या वर्षांनी देखील बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांच्या लग्नाची गोष्ट व्हायरल होताना दिसते आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सलमानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत असून त्यात त्यानं जुही आणि तिच्या कुटूंबियांच्या मनात आपल्याविषयी असलेली अढी याविषयी सांगितलं आहे.सोशल मीडियावर अजुनही तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये सलमान असे म्हणतो आहे की त्यानं जुहीच्या वडिलांकडे तिच्यासोबत लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र जुहीच्या वडिलांनी त्याला नकार दिला. त्यांनी सलमानची ती मागणी रिजेक्ट केली होती. ९० च्या दशकांतील त्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी त्यांच्या लेखी तितकासा कार्यक्षम आणि प्रभावी नव्हतो. त्यामुळे त्यांनी मला नकार दिला. अशी सलमानची प्रतिक्रिया होती.



सध्या सोशल मीडियावर न्युज १८ ची एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यात जुहीला त्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओविषयी विचारण्यात आले होते. त्यात तिनं म्हटले होते की, माझ्या करिअरला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि तेव्हा सलमान खान हा आता इतका लोकप्रिय नव्हता. माझ्याकडे फिल्म आली होती. आणि त्यामध्ये तो लीड रोलमध्ये होता. मी त्याला तेव्हा फारसं ओळखत नव्हती. फक्त सलमान खानच नाहीतर आमीरला देखील मी ओळखत नव्हते. बॉलीवूडमध्ये कुणीही फारसं ओळखीचं नव्हतं. त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच नव्हता.जुही पुढे म्हणाली, सलमान मला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ती गोष्ट सांगायला विसरत नाही. ती म्हणजे मी तुला लग्नासाठी मागणी घातली होती. तू माझ्यासोबत कधीही चित्रपट केला नाहीस. मला एक गोष्ट माहिती आहे. ती म्हणजे भलेही आम्ही एकमेकांसोबत कधीही काम केले नसेल, पण आम्ही बरेच स्टेज शो एकत्रित केले आहेत. दीवाना मस्तानामध्ये त्याचा कॅमिओ होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने