भाईजानसाठी पब्लिक खुळी! किसी का भाई किसी की जानच्या ट्रेलरचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला..

मुंबई:  बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या फॅन फॉलोविंगची फक्त भारतातच नव्हे तर जगभर चर्चा असते. त्यातच आघाडीचं नाव म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.सलमान सध्या त्याच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटातील सगळेच गाणे हिट झाले असून सलमानच्या चाहत्यांना त्याचा लुंगी डान्सही खुप आवडला आहे. सलमान खानच्या या चित्रपटाचा टिझर शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटासोबत रिलिज करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे गाणे रिलिज करण्यात आलीत. यात सलमानच्या चाहत्यांना त्याची आणि पुजा हेगडेची जोडी खुप आवडली आहे. या चित्रपटाचा ट्रेलरची चाहत्यांना खुप प्रतिक्षा लागून होती. आज या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्याच्या भेटीला येणार आहे. मात्र सलमानचे चाहते इतके उत्सूक आहेत की त्यामुळे #KisiKaBhaiKisiKiJaanTrailer हा हॅशटॅगच ट्विटरला ट्रेंड होत आहे.'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. पण त्याआधी आज निर्माते चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत. यावरून सलमान खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. किसी का भाई किसी की जान ट्रेलर हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.सलमानचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजबद्दल सतत ट्विट करत आहेत. सलमानच्या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत असल्याच ते ट्विट करत सांगत आहेत.आज संध्याकाळी ६ वाजता हा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. यासाठी मुंबईत एक लाँच इव्हेंटही आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमान खान देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सलमान सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे अधिक प्रमोशन करत आहे.याचे अनेक व्हिडिओ आणि मिम्सही ट्विटर वर व्हायरल होत आहेत. ज्यात सलमानचे चाहते किती उत्सुक आहेत हे दिसत आहे.

याआधी सलमानने पोस्ट करत ट्रेलर रिलिजविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर करताना चित्रपटाचे नवीन पोस्टरही शेअर केले होते. सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उद्या किसी की भाई किसी की जानचा ट्रेलर तुमच्या भाऊ आणि जानसोबत बघा'.याआधी सलमानने पोस्ट करत ट्रेलर रिलिजविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर करताना चित्रपटाचे नवीन पोस्टरही शेअर केले होते. सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उद्या किसी की भाई किसी की जानचा ट्रेलर तुमच्या भाऊ आणि जानसोबत बघा'.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने