'या' कारणामुळे कधीच अभिनेता बनू शकत नाही आर्यन खान.. एका मुलाखतीत शाहरुखचा मोठा खुलासा

मुंबई: बॉलीवूडमध्ये नेहमीच असा ट्रेन्ड पाहिला गेलाय की जर कोणी अभिनेता हिट झाला तर त्याच्या मुलांकडूनही अनेक जण अभिनय क्षेत्रात काहीतरी धमाकेदार करण्याची आशा बाळगतात. अनेकदा असं होतं देखील पण बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलानं मात्र चाहत्यांच्या या आशेला पार गुंडाळून ठेवलं ना राव.कारण शाहरुखचा मुलगा कधीच अभिनयात करिअर करताना दिसणार नाही. या गोष्टींचा खुलासा करत शाहरुख खान एकदा म्हणाला होता की माझा मुलगा कधीच अभिनेता बनू शकत नाही.शाहरुख खाननं जुन्या मुलाखतीत आपला मोठा मुलगा आर्यन खानविरोधात मोठा खुलासा केला होता. या व्हिडीओत शाहरुख खाननं आर्यन संदर्भात बोलताना म्हटलं होतं की-माझा मुलगा आर्यन कधीच अभिनेता बनू शकत नाही कारण त्याला स्वतःलाच अॅक्टर बनण्यात इंट्रेस्ट नाही. आणि त्यामुळे मला देखील वाटतं की तो कधीच अभिनेता बनू शकत नाही. नेहमी भारतात पाहिलं गेलं आहे की वडील सिनेस्टार असले की मुलगा देखील सिनेस्टारच बनतो. तो हॅन्डसम आहे,उंच आहे. पण त्या स्वतःलाच याची जाणीव खूप योग्य वेळी झाली की तो अभिनेता बनू शकत नाही. हो पण तो उत्तम लेखक आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान खूप स्टायलिश आणि हॅन्डसम आहे. वो नेहमीच कोणत्या ना कोणत्या पार्टीत किंवा कार्यक्रमाला पोहोचतो तेव्हा अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. शाहरुखची कॉपी म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. आर्यन खानच्या इंडस्ट्रीतील पदार्पणाची सगळेच वाट पाहत आहेत पण शाहरुखची लेक सुहाना मात्र तिच्या धमाकेदार एन्ट्रीसाठी सज्ज झालीय. लवकरच द आर्चीज मध्ये ती दिसणार आहे. नुकतंच ती मेकब्रॅन्डची ब्रॅन्ड एंबेसेडर झाली आहे. लॉचिंगच्या वेळेला तिनं घातलेल्या रेड ड्रेसमधील तिचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने