जलसंधारणात महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महायुतीचं सरकार...

मुंबई: जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला आहे. जलशक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच भारतीय जलसंस्थांची गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालामध्ये जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

'महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण! जलशक्ती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या पहिल्या जनगणनेच्या अहवालानुसार जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक जलसंधारणाच्या योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत.महाराष्ट्राला पाण्याची समस्या यापुढे जाणवणार नाही याबद्दल महायुती सरकार कटिबद्ध असून त्यास अनुसरून विविध योजना देखील यशस्वीपणे सरकार राबवित आहे.' अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.राज्यामध्ये राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने २०१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये विविध तांत्रिक बाबींवर आधारित प्रकल्प राबविण्यात येतात.राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये देशातील राज्य व केंद्र शासनाच्या एकूण ४९ अंमलबजावणी यंत्रणा आहेत. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून, पुढील टप्प्यामध्ये प्रकल्पाची वाटचाल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने