मुंबई: बॉलिवूडमधील धमाकेदार दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. आता तो धमाकेदार का आहे हे त्याचे चित्रपट पाहून कळतच. जोरदार अॅक्शन, आलीशान गाड्या आणि ह्युमरस कॉमेडी यांचा परफेक्ट मेळ साधून दर्जेदार चित्रपट बनवणारा दिग्दर्शक कायम चर्चेत असतो.रोहितचे अनेक चित्रपट आपण पाहिले आणि प्रेक्षकांनी अक्षरशः ते डोक्यावर घेतले. गोलमाल, सिंघम, सर्कस असा कोणताच चित्रपट आपण विसरू शकत नाही. त्याच्या सगळ्या चित्रपटात तो आवर्जून मराठी कलाकारांना संधी देत असतो.त्याला मराठी विषयीचं असलेलं प्रेम एवढ्यावरच मर्यादित राहत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रोहित चक्क मराठी पदार्थांच्या प्रेमात आहे, याबाबत तो स्वतःच एका मुलाखतीत बोलला आहे.
रोहित शेट्टी नुकताच त्याचा पहिला मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आला. ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेले काही दिवस या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत होती. याचनिमित्त एका माध्यमाला रोहितने मुलाखत दिली यावेळी त्याने मराठमोळ्या जेवणाचं भरभरून कौतुक केलं.यावेळी रोहितला, तुझा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ कोणता? असं विचारण्यात आलं. त्यावर रोहित म्हणाला, ''मला झुणका-भाकरी आणि ठेचा खूप आवडतो. '' रोहितचं हे उत्तर ऐकून सर्वच चाहते खुश झाले आहेत.याआधी त्याने कायमच मराठी भाषा, संस्कृती याचा आदर करून त्याच्याशी असलेलं नात दाखवलेल आहे. त्यामुळे त्याचं हे उत्तर आता चाहत्यांना भावलं असून त्यांचं कौतुक होत आहे.