महिलांना ५० टक्के नव्हे, तर मोफत बसप्रवास; काँग्रेसचं निवडणुकीत आश्वासन

बंगळुरू: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राज्यातील सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधी यांनी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला.काँग्रेसने निवडणुकीतील आश्वासन पूर्ण न केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेलाही राहुल यांनी प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी म्हणाले, “आमच्या चार जाहीर आश्वासनांमध्ये आणखी एका आश्वासनाची भर घालत आहे. यानुसार काँग्रेस सत्तेवर येताच पहिल्याच दिवशी पाचवं आश्वासन पूर्ण केलं जाईल, ज्याअंतर्गत संपूर्ण कर्नाटकात महिलांना सार्वजनिक वाहतूक बसमधून मोफत प्रवास करता येईल.



राहुल म्हणाले, “भाजपच्या लोकांनी 40 टक्के कमिशनच्या माध्यमातून कर्नाटकातील महिलांचा पैसा लुटला, असो. ते तुमचं काम आहे, तर आमचं काम राज्याच्या पैशाचा फायदा कर्नाटकातील महिलांना देण्याचं आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच बसमध्ये महिलांना प्रवासासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही.काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात 'गृहज्योती' योजनेंतर्गत दरमहा २०० युनिट मोफत वीज, 'गृहलक्ष्मी' योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा 2,000 रुपये, तसेच 'अण्णा भाग्य' या अंतर्गत बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा १० किलो तांदूळ देण्यात येणार आहे. याशिवाय य़ुवानिधी अंतर्गत बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये तर डिप्लोमा धारकांना १५०० रुपये दरमान दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने