जिराफ म्हणजे पक्षी... जान्हवी कपूरचं जनरल नॉलेज पाहून फराहनेही लावला होता डोक्याला हात

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची गणना इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्समध्ये केली जाते. अभिनेत्रीने करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्या विरुद्ध अभिनेता ईशान खट्टरही दिसला होता. जान्हवीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग आहे.सध्या या अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी जिराफला 'पक्षी' म्हणताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फराह खानच्या शो 'बॅकबेंचर्स'चा आहे. अभिनेत्रीने वरुण शर्मासोबत 'रुही' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये हजेरी लावली होती.व्हिडिओमध्ये, फराह जान्हवी आणि वरुणला विचारताना दिसत आहे, "कोणता पक्षी आपली मान 270 अंश फिरवू शकतो?", ज्यावर वरुण "उल्लू" असे उत्तर देतो तर जान्हवी "जिराफ" म्हणते, ज्यामुळे फराहला धक्काच बसतो.हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्व बाजूंनी कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने म्हटले, 'मला वाटते की तिला पक्ष्यांच्या अर्थ कळत नाही म्हणून ती गोंधळली आणि जिराफ म्हणाली', एका यूजरने, 'तिला पक्षी हे काय आहे तेच माहित नाही.' अशी कमेंटही केली.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी नितेश तिवारीच्या 'बवाल' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदाच अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री राजकुमार रावसोबत त्याच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातही दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने