सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोफत मिळतेय सोन्याचे नाणे;

मुंबई: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. यावर्षी हा सण 22 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा दिवस जवळ येताच सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. यासोबतच लोक या दिवशी चांदी आणि हिऱ्यांची खूप खरेदी करतात. मात्र सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झाला आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक मोठ्या ज्वेलर्सनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने खास ऑफर आणल्या आहेत.



50% पर्यंत सूट मिळत आहे :

अक्षय्य तृतीयेच्या विशेष प्रसंगी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, अनेक ज्वेलरी ब्रँड्सनी त्यांच्या मेकिंग चार्जेसवर 50% पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत सोने आणि हिऱ्याच्या दोन्ही दागिन्यांवर उपलब्ध आहे.

तनिष्कवर भारी सवलत

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने, टाटाचा ज्वेलरी ब्रँड तनिष्क त्याच्या मेकिंग चार्जेसवर मोठी सवलत ऑफर देत आहे. कंपनीचे सोन्याचे दागिने आणि डायमंड ज्वेलरी खरेदीवर ग्राहकांना मेकिंग चार्जेसमध्ये 25% पर्यंत सूट मिळत आहे.ही ऑफर 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023 पर्यंत वैध आहे. ग्राहकांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या चार्जेसवर 10%, 3 ते 7 लाख रुपयांवर 15%, 7 ते 15 लाख रुपयांवर 20% आणि 15 लाख रुपयांच्या वर 25% सूट मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने