'किसी का भाई किसी की जान' साऊथ चित्रपट आहे की हिंदी? युजर्सच्या प्रश्नाला पूजा हेगडेने दिलं धडधडीत उत्तर

मुंबई:  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा हा चित्रपट उद्या म्हणजेच २१ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात साऊथची दमदार अभिनेत्री पूजा हेगडे पहिल्यांदाच पडद्यावर भाईजानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.चित्रपटाच्या स्टारकास्टने मनापासून चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. दरम्यान, चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पूजा हिने एका माध्यम संस्थेशी संवाद साधताना तिच्या अपेक्षांबद्दल सांगितले.ती म्हणाली की मी खूप उत्साही आहे आणि नर्व्हसही आहे. माझ्या मनात सध्या संमिश्र भावना आहेत. पूजा पुढे म्हणाली की, मला आशा आहे की या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल.



अभिनेत्री शेवटची प्रभाससोबत 'राधे श्याम' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. त्याचवेळी पूजा रणवीर सिंगसोबत 'सर्कस' या चित्रपटाचाही एक भाग होती. तिचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'किसी का भाई किसी की जान' चा धमाकेदार ट्रेलर शेअर केला, ज्यानंतर वापरकर्त्यांनी लाईक आणि कमेंट करण्यास सुरुवात केली. किस किस को ये बॉलीवूड नही साऊथ फिल्म लग रही है अशी कमेंट एका व्यक्तीने केली, ज्याला पूजाने उत्तर दिले की, 'चित्रपटात मी तेलुगू आहे. आता भारतीय चित्रपट एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे.'

ती पुढे म्हणाली, “मुलगी तेलगू असल्याने आम्ही चित्रपटात 'बथुकम्मा' देखील दाखवला आहे. हा तेलगू सण आहे. तिथे तो तेलुगुमध्ये गातोय कारण ते हिंदीत दाखवणे विचित्र झाले असते. म्हणून जे स्क्रिप्टसाठी ऑथेंटिक आहे. ते केलं जातं."फरहाद सामजीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि इतर अनेक प्रमुख कलाकार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने