बॉलीवूडमध्ये कोण राहतंय की नाही...भन्सालीही हॉलीवूडच्या वाटेवर..

मुंबई: बॉलीवूडवाले सध्या हॉलीवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करताना दिसत आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा,दिग्दर्शक एसस राजामौलीनंतर बॉलीवूडचे दिग्गज निर्माते संजय लीला भन्साली देखील हॉलीवूडची वाट पकडणार आहेत.रिपोर्टनुसार भन्साली प्रॉडक्शननं हॉलीवूड एजन्सी डब्ल्यूएमई सोबत डील केलं आहे. याआधी संजय लीला भन्साली यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला इंटरनॅशनल अॅवॉर्ड देण्यासाठी कॅंपेन चालवलं गेलं होतं आणि याच्या काही महिन्यानंतरच डीलची रीपोर्ट समोर आली आहे.



भन्सालींचं नाव आंतराष्ट्रीय पातळीवर काही नवीन नाही. त्यांच्या 'देवदास' सिनेमाला कान फिल्म फेस्टिव्हलमधील प्रीमियर नंतर सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा फिल्म कॅटेगरीत बाफ्टासाठी नॉमिनेशन मिळालं होतं.'गंगूबाई'नं बर्लिनं फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केलं होतं. नेटफ्लिक्सवर देखील हा सिनेमा लोकप्रिय भारतीय सिनेमांपैकी एक ठरला आणि आलिया भट्टच्या अभिनयाचं आंतराष्ट्रीय पातळीवर कौतूक झालं. आलिया देखील लवकरच 'हॅंड ऑफ गॉड' या स्पाय थ्रिलरमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमात गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन देखील आहेत.सध्या संजय लीला भन्साली आपल्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करत आहेत,ज्याचं नाव 'हिरामंडी' असून तो एक पीरियड ड्रामा आहे. भन्सालींनी या सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी केली होती.

या प्रोजेक्ट संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही घडली की नेटफ्लिक्सचे को-सीईओ टेड सारंडोस हे मुंबईत आले आणि त्यांनी भन्सालींसोबत 'हिरामंडी' संदर्भात बातचीत केली.यानंतर भन्साली म्हणाले होते की,''डिजिटल प्लॅटफॉर्मनं हिरामंडीला खूप मोठं बनवलं''. भन्साली यांनी या इव्हेंटमध्ये सांगितलं होतं की, ''हीरामंडी माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे..आणि मला या प्रोजेक्टच्या निमित्तानं खास करायचंय जेणेकरुन सांरडोस यांना या सिनेमा सोबत असल्याचा अभिमान वाटेल''.गेल्यावर्षी आरआरआर सिनेमाचे दिग्दर्शक एसएसएस राजामौली यांनी हॉलीवूड एजन्सीचे सीएए सोबत डील केली होती. तसंच,सिनेमातील कलाकार ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरण देखील हॉलीवूड सिनेमाच्या निर्मात्यांच्या संपर्कात आहेत. याआधी भारतीय सिने निर्मात्यांमध्ये शेखर कपूर,तरसेम सिंह आणि मीरा नायर देखील हॉलीवूडमध्ये आपल्या कामाविषयी चर्चेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने