इतिहासात पहिल्यांदाच आर्टिलरीमध्ये महिलांची तुकडी, आता महिलाही करणार शत्रूंवर तोफगोळ्यांचा वार

दिल्ली: भारतीय सेनेत महिला अधिकाऱ्यांची पकड दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे. हा काळ भारतीय महिला सैनिकांसाठी सुवर्ण काळ मानला जाणार. आता सेनेतील महिला अधिकाऱ्यांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.भारतीय लष्कराच्या तोफखान्यात इतिहासात पाहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी (OTA), चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच महिला अधिकाऱ्यांची आज तोफखानाच्या रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तोफखानाच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त केलेल्या पाच महिला अधिकारी यांना समान संधी आणि आव्हाने प्रदान केली जाणार. या पाच महिलांसोबत आणखी १९ पुरुष सैनिकांचीही यात नियुक्ती करण्यात आली आहे.या पाच महिला अधिकाऱ्यांची सर्व प्रकारच्या तोफखाना युनिटमध्ये नियुक्ती केली जात आहे, या महिला आता शत्रूवर तोफगोळे आणि रॉकेट डागणार असून महिला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे हे पाऊल आहे. या पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन महिला अधिकारी उत्तरेकडील सीमेवर तैनात केलेल्या तुकड्यांमध्ये तर इतर दोन पश्चिमेकडे रेजिमेंटमध्ये त्यांना तैनात करण्यात येणार आहे.

जानेवारीमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्याला नंतर सरकारने सुद्धा परवानगी दिली. आर्टिलरीमध्ये नियुक्त झालेल्या पाच महिला अधिकाऱ्यांची ही पहिली तुकडी आहे.यांसंदर्भात बोलताना तैनात करण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी साक्षी बुबे सांगतात, "लहानपणापासून सैन्यात भरती होण्यासाठी माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहीत केले. तोफखाना युनिट हे महिला अधिकाऱ्यांसाठी चांगली संधी आहे."लेफ्टनंट अदिती यादव सांगते, "माझे वडील भारतीय सैन्यात आहे आणि आणि आता महिला अधिकाऱ्यांसाठी तोफखाना युनिट सुरू केल्याने मला आनंद होत आहे. भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्व महिलांना मी सांगू इच्छिते, ही हे एक चांगली फिल्ड आहे, यात शंका नाही. म्हणून बिनधास्त जॉईन व्हा."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने