ब्रिज भूषण सिंह अध्यक्षपदापासून दूर होणार

मुंबई: महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आलेले ब्रिज भूषण सिंह आगामी सात मे रोजी होणारी भारतीय कुस्ती संघटनेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत. ब्रिज भूषण यांनी स्वत: याबाबत स्पष्ट सांगितले आहे. मात्र भारतीय कुस्ती संघटनेमध्ये नवीन भूमिका स्वीकारणार असल्याचे संकेत त्यांच्याकडून याप्रसंगी देण्यात आले आहेत.आपत्कालीन सर्वसाधारण परिषद व कार्यकारिणी बैठक बोलावण्यात आली होती. सरचिटणीस व्ही. एन. प्रसूद यांच्या अधिपत्याखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेच्या आगामी निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यात आली.ब्रिज भूषण यांनी अध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. त्यांनी १२ वर्षे कार्यकाळ पूर्ण केला आहे. आचारसंहितेनुसार आता त्यांना मोठ्या पदावर कार्यरत होता येणार नाही. आता त्यांचे वय ६६ आहे. त्यांना चार वर्षे कुलींग ऑफ पीरियडचा सामना करावा लागेल. त्यानंतर त्यांचे वय ७० होईल.जर माझ्याकडून चूक झाली असती तर साक्षी मलिकने तिच्या लग्नाला मला आमंत्रित कसे काय केले असते? सर्व कुस्तीपटू माझ्याकडे यायचे आणि स्वत:च्या अडचणी बोलून दाखवायचे. माझ्या कुटुंबासमवेत ते जेवण करायचे. तर मग अचानक माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप कसा काय केला जाऊ शकतो. जर असे असेल तर ते माझ्या घरी का येत असत?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने